कोविड संकटातून उभारी घेणाऱ्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे;आणि यात योगदान द्यायचे की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकाने ठरवायचे आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे; भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देश राहिलेला नाही; आता जगातला एकासशक्त, बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचे आहे, आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल हामूलमंत्र महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. कोविड काळात आपल्या जीवांची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले.