शेतक-यांनी काल पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही झाला - रेल्वे मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांनी काल पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. यामुळे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. देशातल्या बहुतांश मंडळांमध्ये आंदोलकांकडून काही भागात तुरळक गाड्या थांबविण्यात आल्या परंतु आता रेल्वेचे कामकाज पूर्ववत सुरु असून गाड्याही सुरळीतपणे सुरू असल्याचं मंत्रालयाने म्हटले आहे.