दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वसा, वारसा जतन करू या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वसा, वारसा जतन करू या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रयत्नपूर्वक जतन करू या’, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

सह्याद्री राज्य अथितीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. या विषयांतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक दर्पण हे नियतकालिक सुरु केले. आचार्यांनी व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकारितेचा वसा आणि वारसा दिला आहे. यातूनच पत्रकारितेत लोकहितासाठी संघर्ष आणि चळवळींना बळ देणारी मुल्ये रुजली. पुढे मराठी पत्रकारितेने स्वातंत्र्य संग्रामातही ठाम आणि चोख भूमिका बजावली आहे. पत्रकारितेमध्ये आधुनिकतेसह विविध प्रवाह आले आहेत. त्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला हा वारसा प्रयत्नपूर्वक जतन करण्याची गरज आहे.