भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे- ओम बिर्ला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वायत्त जिल्हा मंडळे अर्थात एडीसी स्थापन करण्यामागे ईशान्य भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत समानाधिकार मिळवून देणे आणि त्यांच्या परंपरांनुसार प्रशासकीय कामकाज चालवण्याची हमी हा हेतू असल्याचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल सांगितले.

बिर्ला सध्या मेघालय दौऱ्यावर आहेत. ईशान्येकडील राज्यं भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगळी आहेत. त्यांचं हे वेगळेपण लक्षात घेऊन घटनेत एडीसी ची विशेष तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले.