देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी केली चिंता व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :येत्या २०२५ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

"रस्ता सुरक्षिततेमधली आव्हाने आणि उपाययोजना" या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या भारतीय शाखेने हा वेबिनार आयोजित केला होता.

देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. याबाबतीत भारत अमेरिका आणि चीनच्याही पुढे आहे असे ते म्हणाले.

अपघात कमी करण्याच्या उद्देशाने रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्चाचा उपक्रम प्रस्तावित असल्याचे गडकरी म्हणाले.

रस्ता सुरक्षितते संबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सध्या देशभर रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे.

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image