कोविड लसीच्या आणखी साडे सात लाख डोसची केंद्राकडे मागणी - राजेश टोपे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याला केंद्राकडून कोविड लसीचे दहा लाख डोस प्राप्त झाले असून, नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे, आणखी साडे सात लाख डोसची आवश्यकता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

ते काल जालना इथं लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर बोलत होते. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लवकरच पत्र पाठवणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.