संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. येत्या ३१ तारखेला ही बैठक होणार असून तत्पूर्वी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीदेखील २९ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सरकारनंही ३० तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात होणार आहे. तर १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते ९ या वेळेत होणार आहे. पहिले सत्र १५ फेब्रुवारी रोजी संपणार असून दुस-या सत्रातील कामकाज ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दरम्यान येत्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image