शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही यात्रा शांततेत काढण्याच्या हमीवर दिल्ली पोलीसांनी ही परवानगी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर टिकरी, सिंघू आणि गाझीपुर या तीन सीमांवरून ही यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली असून, या ठिकाणचे बॅरीकेडस काढून टाकण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं.