राज्यात तीन हजार दोनशे ब्याऐंशी नवे कोविडग्रस्त राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ११० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ४२ हजार १३६ झाली आहे. तसंच राज्यात ५४ हजार ३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ६६६ झाली आहे.

राज्यातला मृत्यू दर २ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे.

मुंबईत काल ६९५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. आतापर्यंत २ लाख ७४ हजार ७६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

काल ५९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ९४हजार ६५९ झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३५६ दिवसांवर घसरला आहे. सध्या ७ हजार ८९२ रुग्ण उपचार घेत आहेत.