राष्ट्रपतींच्या हस्ते या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला. राष्ट्रपती भवनात एका बालकाला  पोलिओ लसीचे थेंब पाजून मोहिमेची सुरुवात झाली. श्रीमती  सविता कोविंद,  केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते.

उद्या राष्ट्रीय लसीकरण दिवस असून देशभरात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओची लस पाजली  जाईल.