हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला ७३ फुटी तिरंगा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोररनं विक्रम केला असून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर ७३ फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केलं आहे.

मराठी चित्रपट तारका मीरा जोशी आणि आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे हे ही या मोहिमेत सहभागी झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ४५ लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन विक्रम नोंदवला आहे.

नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, नांदेड इथल्या ४५ लोकांनी ३ दिवसांच्या या ट्रेकिंग मोहिमेत सांधण दरी आणि हरिश्चंद्रगड सर करून काल ७३ फुटी तिरंगा फडकवला.