बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियम, अर्थात अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत दिली जाणार आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांनाही मिळणार आहे.

विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि., मुंबई या संस्थेनं मुंबईत १ नोव्हेंबर १९९६ रोजी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या "पॉप शो" कार्यक्रमास  फेरविचारांती करमणूक शुल्क आणि अधिभार आकारणीतून सूट द्यायचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला.