हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग केला जाईल, आणि त्या अनुषंगानं या अधिवेशनात विचार विनीमय केला जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना आधी ते आज वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या भरभराटीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचंही ते म्हणाले. या दशकातलं हे पहिलं अधिवेशन आहे