अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

  परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार

मुंबई  : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रूपये नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.१० हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रती हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.

या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image