शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे एक मराठा, लाख मराठा संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण

 

पिंपरी : महाराष्ट्रातील सर्वदूर गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्याचे ध्येय तसेच राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांचे जतन व संवर्धन हे उद्दिष्ठ ठेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक मराठा, लाख मराठा’ हि संस्था कार्य करणार आहे. असे प्रतिपादन संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रतिक पवार यांनी केले.

रविवारी (दि. 17 जानेवारी) बारामती येथिल गोविंद बाग येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ‘एक मराठा, लाख मराठा’ या नोंदणीकृत संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विक्रांत पवार, संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य युवराज दाखले, तसेच सचिन लिमकर, संजय माने, सुनिल सोनवणे, आकाश शेवाळे, स्वप्निल गाडे, वेदांत जाधव, प्रा. काशीनाथ आल्हाट, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य युवराज दाखले प्रास्ताविक करताना म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराबरोबरच क्रिडा व कला, सांस्कृतिक क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी संस्कृतीस उत्तेजन देणे, सामजाच्या उन्नती आणि कल्याणासाठी काम करणे तसेच देशातील बाराबलुतेदार समाजातील समाज बांधवांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हि संस्था कार्य करणार आहे. राज्यातील गडकोट किल्ल्यांना युवकांनी भेटी द्याव्यात पण त्यांचे पावित्र्यं व स्वच्छता देखील राखली जावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी हि संस्था काम करणार आहे. या संस्थेत काम करण्यासाठी राज्यातील उद्योजक व युवक, युवतींनी संपर्क साधावा असेही आवाहन युवराज दाखले यांनी केले.
स्वागत विक्रांत पवार, सुत्रसंचालन प्रा. काशीनाथ आल्हाट आणि आभार रामदास तांबे यांनी मानले.


Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image