खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

 Khelo India (@kheloindia) | Twitter

पुणे: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम  सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.  केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील या राज्य निपुणता केंद्रामध्ये ॲथलेटिक्स, शूटिंग व सायकलिंग या तीनही ऑलिंपिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रति खेळ 30 खेळाडूंना या केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.  या केंद्रासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर देखील मंजूर करण्यात आल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही- आदर पूनावाला
Image