राज्यात सर्वत्र हवामान कोरडं

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असलं तरी थंडी काल आणखी कमी झाली. सर्वच भागात कालही किमान तापमान १ ते ३ अंशांनी वाढलं.

गोंदिया वगळता इतर सर्व जिल्ह्यातलं किमान तापमान काल २ अंकी होतं. गोंदियात सर्वात कमी ९ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.

नागपुरातलं तापमान १० अंश आणि बाकी सर्वत्र त्यापेक्षा अधिक होतं. आगामी २ ते ३ दिवस थंडी वाढणार नाही त्यानंतर मात्र थंडीचा कडाका वाढू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे.