आजपासून सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

महिनाभराच्या या अभियानात राज्यात सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे.


पोलिओ लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर ही मोहिम राबवण्यात येणार आहे, या सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असेल.

घरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे.