देशात २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २४ हजार नऊशे रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख ७ हजार ५६९ वर पोहोचली आहे.

देशातला कोरोनाचं रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ९२ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे.देशात काल  कोरोनाचे १६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातली एकूण रुग्णसंख्या १ कोटी २ लाख २४ हजार ३०३ इतकी झाली.

२५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आतापर्यंत या आजारानं दगावलेल्यांची संख्या १ लाख ४८ हजार १५३ वर पोहोचली. देशात सध्या २ लाख ६८ हजार ५८१ रुग्ण उपचार घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.