व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ

 


मुंबई: भारतातील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारा व्हेंचर कॅटलिट्स ग्रुप (व्हीकॅट्स) हा कोव्हिड-१९ साथीच्या काळाती पुन्हा एकदा या श्रेणीत २०२० या वर्षातील अग्रेसर लीडर म्हणून पुढे आला आहे. ही मुंबईतील गुंतवणूक संस्था असून ती इन्क्युबेटर व सेबी रजिस्टर्ड अॅक्सलरेटर फंड ९युनिकॉर्न्स चालवते. या संस्थेने मागील ६३ करारांच्या तुलनेत या वर्षी १०२ या सर्वाधिक संख्येने करार केले.

भारतातील लहान शहरांतील स्टार्ट-अप इकोसिस्टिम मजबूत करण्यावर भर असलेल्या व्हीकॅट्सने विविध क्षेत्रातील कल्पनेच्या स्वरुपात असलेल्या तसेच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या बिझनेसमध्ये यावर्षी ७०० कोटी रुपये सिंडिकेशनद्वारे गुंतवले. २०१९ मध्ये ही गुंतवणूक ५०० कोटी रुपयांची होती.

व्हेंचर कॅटलिट्स ग्रुपचे सह संस्थापक व अध्यक्ष अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “२०२० मध्ये भारत व विदेशातील असंख्य गुंतवणूक संस्थांनी गुंतवणुकीची प्रक्रिया धीमी केली असताना, आम्ही वृद्धी कायम ठेवली. संस्थापकपूरक गुंतवणुकदार या नात्याने विचार केल्यास, प्रत्येक संकट हे संधी घेऊन येत असते, यावर आम्ही विश्वास ठेवतो. अर्थात, आम्ही योग्य मूल्यांकनानुसार नावीन्यपूर्ण व चांगल्या स्टार्टअपची निवड करू शकलो आणि या आशादायी  स्टार्टअप्सच्या पाठीशी उभे राहिलो. ”

अग्रगण्य जागतिक रिसर्च फर्म- ट्रॅक्सन आणि क्रंचबेसच्या आकडेवारीनुसार, व्हीकॅट्सने सुरुवातीच्या टप्प्यातील किंवा कल्पनेच्या टप्प्यातील गुंतवणूक करणाऱ्या संस्थांना मागे टाकले. यात एंजललिस्ट इंडिया, लेट्सव्हेंचर, मुंबई एंजल्स आणि ब्लूम व्हेंचर यांचा समावेश आहे. स्टार्ट-अपमधील निधीत गुंतवणुकीपासून त्यांच्या अस्तित्वापर्यंतच्या सर्व निकषांनुसार ही तुलना करण्यात आली. सलग दुस-या वर्षी व्हीकॅट्सने, जागतिक स्तरावरील १० सर्वात सक्रिय अॅक्सलरेटर्स आणि इन्क्युबेटर्सच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत वायकॉम्बिनेटर आणि टेकस्टँडर्डनंतर कंपनीने तिसरे स्थान पटकावले. तसेच प्लगअँड प्ले, ५०० स्टार्टअप्स, एसओएसव्ही आणि अँटलर ग्लोबल या संस्थांना करार संख्येच्या निकषावर मागे टाकले.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image