इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी काल जाहीर झाली. ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित झाला आहे अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचं नाव एसएमएस द्वारे कळवण्यात आलं आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेण्यास सुरुवात केली. काल जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.