कोरोनाप्रतिबंधक लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी शितगृह उभारणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. या शितगृहांसाठी जागेचा शोध सुरु आहे. सध्या कांजुरमार्ग इथली जागा निश्चित केली आहे असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत लस उपलब्ध झाल्यावर सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे डॉक्टर, परिचारिका, निम्नवैद्यकीय कर्मचारी, वॉर्ड बॉय अशा अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना प्रधान्यानं लस दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.