गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत चालू वर्षात 557 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामी गंगे या गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत चालू वर्षात 557 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सांडपाण्याचे वव्यस्थापन, प्रदूषण पातळीत घट, जैवविविधतेमध्ये वाढ होण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे आहेत.

याच बरोबर जलशक्ती मंत्रालायनं देशातल्या धरणांच्या स्थितीबद्दलही अहवाल प्रसिद्ध केलं असून देशात पाच हजार 334 मोठी धरणं असून धरणांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 411 धरणांचे काम सुरू असून राजस्थान, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात पूरस्थितीचा अंदाज वर्तवणारी नवी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.