कोविड – 19 रुग्णांकरीता आवश्यक साधनसामग्रीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

 

पुणे  - कोविड -19 च्या रुग्णांकरीता सीएसआर फंडामधून करण्यात आलेल्या कामांचा व त्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री  तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. विधानभवन,पुणे या ठिकाणी होणार आहे.

कोविड – 19 च्या संसर्गबाधित रुग्णांकरीता राज्य शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यापैकी पुणे जिल्हयामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांकरीता ॲक्सीस बँक,बंधन बॅक व एच.डी.एफ.सी बँकेमार्फत सामाजिक जबाबदारीचा वाटा लक्षात घेवून त्यांच्या सीएसआर फंडामधून काही साधनसाम्रगीचा पुरवठा करण्यात आला.

यामध्ये ॲक्सीस बँकेमार्फत  स्वच्छ भारत अभियान व कोविड-19 महामारी नियंत्रण कार्याच्या देखरेखीसाठी पीएमसी टास्क ॲप, बंधन बँकेमार्फत  दळवी रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन प्रणाली व 98 ऑक्सिजन पाँईट, ससून रुग्णालयातील 4 डयुरा सिलेंडर व वॅपोरायझर मशिन, टिव्ही सेट सहित कोविड एडयुटमेंट प्रणाली -16, कोविड एडयुटमेंट प्रणाली-151 तसेच एसडीएफसी बँकेमार्फत लायगुडे रुग्णालयातील मेडीकल ऑक्सिजन प्लान्ट-2 करीता एचएएल क्लाऊड क्लिनिक मशिन – 20 (स्वयंचलीत 33 चाचण्यांसाठी ), संगणक संच व प्रिंटर -15, ए 1 कोविड डिटेक्शन- पोर्टेबल एक्स रे मशीन आणि एसी -26,000 चाचण्या, ईसीजी मशीन -28, कार्डियाक रुग्णवाहिका -1, हर्से व्हॅन-1, नेगेटिव आयन जनरेटर ( ॲन्टी बॅक्टेरिया आणि ॲन्टी व्हायरस)-226, पोर्टेबल एक्स-रे मशीन आणि डिजीस्टर (28) त्याचप्रमाणे पुणे शहरासाठी फिरता दवाखाना व मोफत औषधे व मधुमेह तपासणी -6  इ. साधनसामग्रीचा लोकार्पण होणार आहे.

यावेळी जिल्हयातील सर्व खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image