भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था):पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे.


या सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्य अंतर्भूत आहेः


1. वैद्यकिय व्यावसायिक व इतर आरोग्य व्यावसायिक यांचे आदानप्रदान व प्रशिक्षण


2. मानव संसाधन आणि आरोग्य सुविधांच्या स्थापनेत परस्परसहकार्य


3. औषधनिर्माण, वैद्यकिय उपकरणे आणि सौंदर्यसाधने यांच्या प्रमाणीकरणाबद्दलच्या माहितीचे आदानप्रदान


4. हवामानासंबधित धोक्यांनुसार नागरिकांचे आरोग्य परिक्षण आणि धोक्यांचे निराकरण वा अनुकूलन यावर आधारित सार्वजनिक आरोग्याशी संबधित कृती यांच्या मूल्यांकनांतील कौशल्याचे आदानप्रदान


5. हवामानाधारित पायाभूत सुविधांसंबधी कौशल्याचे आदानप्रदान तसेच ग्रीन हेल्थकेअरच्या (हवामान-अनुकूल रुग्णालये) विकासासाठी सहकार्य


6. अनेक संबधित क्षेत्रांमध्ये परस्परसंवादी संशोधनाला चालना देणे


7. आणि परस्पर सहमतीने इतर सामायिक क्षेत्रात सहकार्य. 


प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या संबधित व्यवस्थापनाकडून आयोजित गोलमेज सभा, परिसंवाद, सिम्पोजिया, कार्यशाळा आणि परिषदांना उपस्थिती लावण्यासाठी  आपापल्या देशातील प्रतिऩिधींना प्रोत्साहन देणे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image