एंजल ब्रोकिंगची म्युच्युअल फंडसाठी युपीआय ऑटोपे सुविधा


एनपीसीआयची परवानगी ; अशी सुविधा देणारी पहिलीच कंपनी


मुंबई : स्टॉक ब्रोकिंग आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत लीडरशीप डोमेन स्थापन करत एंजल ब्रोकिंगने म्युच्युअल फंड्सच्या युपीआय ऑटोपेकरिता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ची परवानगी मिळवली आहे. अशा प्रकारच्या पहिल्या सुविधेद्वारे ई-मँडेट ऑथेंटिकेशनचा वेळ एका मिनिटापेक्षा कमी करत ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. याद्वारे ई-मँडेट रजिस्ट्रेशनचा खर्चही कमी केला असून याचे व्यवस्थापन बटण टचच्या अनुभवाद्वारे शक्य झाले आहे.


एंजल ब्रोकिंग लि.चे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले,“ आज भारत हा वेगाने डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारत आहे. त्यामुळे ही संधी साधण्याची एकही वेळ एंजल ब्रोकिंग सोडत नाही. भारतीय स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात आम्ही अनेक गोष्टी प्रथमच आणल्या असून यात आणखी एक सुविधा आणताना आम्हाला आनंद होत आहे. एसआयपीसाठी युपीआय ऑटोपे लाँच ई-मँडेट रजिस्ट्रेशनमधील अनेक अडथळे दूर करेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आम्ही एनपीसीआयचे आभारी आहोत.”


या घटनेमुळे म्युच्युअल फंड इकोसिस्टिमला महत्वपूर्ण मूल्य मिळते. कारण युपीआयमध्ये ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे युपीआय ऑटोपे हा एसआयपी ग्राहकांना एक पर्याय ठरेल. तसेच हे एनएसीएच आदेशांचे रजिस्ट्रेशन आणि कॉलिंग अखंडपणे पुरवते. याद्वारे एसआयपींसाठी ई-मँडेट ऑथेंटिकेशनचा टर्नअराउंड वेळ काही सेकंदाने कमी होईल.


रिकरिंग पेमेंटसाठी एनपीसीआयने युपीआय ऑटोपेची सुविधा सुरू केली आहे. युपीआय 2.0 अंतर्गत सुरु झालेल्या या नवीन सुविधेमुळे आता ग्राहक रिकरिंग पेमेंटसाठी कोणत्याही युपीआय अॅप्लीकेशनचा वापर करून रिकरिंग ई मँडेट सक्षम करू शकतात.


‘एंजल ब्रोकिंग’च्या युपीआय ऑटोपे सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व मार्गदर्शक नियामकांचे अनुसरण करत अनेक तपासण्यांद्वारे ही प्रक्रिया केली जाते. यात महत्त्वाचे म्हणजे, ई मँडेटने थर्ड पार्टी पेमेंट व्हॅलीडेशन आणि ऑथेंटिकेशन प्रक्रिया सुलभ केली आहे. उदाहरणार्थ, कोणताही ई-मँडेट केवळ गुंतवणुकदाराच्या बँक खात्यासाठीच जारी केला जाऊ शकतो. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीने एखाद्याच्या खात्यासाठी ई-मँडेट तयार केले, ते मंजूर झाले तरी आमची सिस्टिम आपोआप ते रद्द करते. अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांमुळे आमच्या गुंतवणुकदारांची सुरक्षितता अधिक वाढते,” असे एंजल ब्रोकिंगचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी म्हणाले.