मुंबई लोकलच्या आणखी ७५३ फेऱ्या आजपासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई लोकलच्या आणखी ७५३ फेऱ्या आजपासून सुरु झाल्या आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल याबाबत माहिती दिली. आज सुरु झालेल्या अधिक फेऱ्यांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये भर पडून ती २ हजार ७७३ इतकी होणार आहे. रेलवेच्या अधिक फेऱ्यांमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित होईल,असं त्यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, रेल्वे प्रवासाची परवानगी सर्व प्रवाशांना द्यावी, याबाबत राज्यसरकारनं केलेल्या विनंतीवर आपण उत्तर दिलं असून, सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबाबतच्या उपाययोजना राज्यसरकार लवकरच आपल्याला कळवेल, अशी आशा  मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली  आहे.