राज्यातलं कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९० टक्क्यांवर


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सात हजार ३०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख दहा हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याच प्रमाण ८९ पूर्णांक ९९ शतांश टक्के झालं आहे.

  काल दिवसभरात आणखी पाच हजार ५४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ७८ हजार ४०६ झाली आहे. राज्यभरात काल ७४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ९११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक ६२ शतांश टक्के एवढा आहे. सध्या एक लाख २३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Popular posts
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
Image
राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
Image
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शासकीय ध्वजारोहण
Image