मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभामुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. 


ही मागणी काल मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. या अनुषंगाने ठाकरे सरकारने ११ नोव्हेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेला एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती.