मुंबईत बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना रोज भोजनभत्ता - अनिल परबमुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोजच्या रोज भोजनभत्ता द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.गेली दोन महिने १ हजार बसगाड्यांसाठी साडे चार ४ हजारापेक्षा अधिक एस.टी. कर्मचारी बेस्टच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला दिली होती. मात्र त्याबाबत अनेक तक्रारी आल्यानं हे पाऊल उचललं आहे.कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थाही चांगल्या दर्जाची असावी, यादृष्टीनं पावलं उचलली आहेत