जैश-ए-मोहम्मद चा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी सुरक्षादलाचे मानले आभार


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जैश-ए-मोहम्मद च्या जम्मू आणि काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेवर केलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षादलाचे आभार मानले आहेत.

“पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना ठार केले, दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके होते यातून त्यांची घातपाताची मोठी कारवाई करण्याचा उद्देश होता, त्यांचे प्रयत्न उधळून लावले”. असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.