सिडकोच्या १५ हजार परवडणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर मिळणार


 

मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं.

त्यांनी काल या प्रकल्पाच्या विकासाचा आढावा घेतला. तसंच पुढच्या वर्षी परवडणाऱ्या ६५ हजार घरांचा महाप्रकल्प आकारात येत असून त्याची नोंदणी पुढच्या वर्षी सुरू होईल. हा गृहनिर्माण प्रकल्प एकूण ४ पॅकेजमध्ये साकारण्यात येत आहे. , असंही ते म्हणाले.

डिसेंबर, २०१८ मध्ये 'परिवहन केंद्रीत विकास' संकल्पनेवर आधारित महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ झाला होता. वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, आदी ठिकाणी हा प्रकल्प उभा राहत आहे.

Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image