कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काल व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

या आढावा बैठकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

यात लोकसंख्येतल्या गटांचा प्राधान्यक्रम आरोग्य सेवकांशी संपर्क, शीतगृह सोयींमधे वाढ आणि लस टोचणाऱ्यांची संख्या वाढवणे या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला.