आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आवाहन


पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेण्या-या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय सेवा आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80 डी, 80 जी नुसार गुंतवणूक केली असल्यास त्याची कागदपत्रे दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत कोषागार कार्यालय, पुणे येथे सादर करण्यात यावीत, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी,पुणे यांनी केले आहे.


विहित मुदतीत गुंतवणुकीची कागदपत्रे सादर न केल्यास कलम 191 नुसार आयकराची कपात निवृत्तीवेतनातून 4 हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येईल असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


तसेच ज्या निवृत्तीवेतन धारकांना NEW REGIME प्रमाणे आयकर कपात करावयाची आहे त्यांनी कोषागार कार्यालयाच्या to.pune@zillamahakosh.in यामेल वर अथवा प्रत्यक्षात कळवावे,अन्यथा जुन्या नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल,याची सर्व निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.