अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम


मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक असताना निकालाबाबत अनिश्चितता पसरली आहे. सध्या तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या बाजूने निकाल आहेत. मात्र विभाजित सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमुळे बाजारावर परिणाम होत आहे. कारण सिनेटवर संभाव्य रिपब्लिकन पार्टीचे नियंत्रण असल्याने प्रमुख बिले रोखली जाऊ शकतात असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी केले.


सोने: अमेरिकन निवडणुकीच्या दिवशी, स्पॉट गोल्डचे दर ०.३% नी घसरले व ते १९०३.२ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. निवडणूक निकालाचा मौल्यवान धातूंवर परिणाम झाला असून सोन्यातील नुकसान कमी झाले. सध्याच्या ट्रेंडनुसार, जो बिडेन यांना ऐतिहासिक विजय मिळेल. तथापि, अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चुरशीची लढत देत आहेत. अमेरिकेच्या प्रशासनात बदल झाल्यास प्रोत्साहनपर पॅकेज येऊ शकतात, ज्यामुळे बाजाराची गती बदलेल, अशा विश्वास बाजाराला वाटतो.


महागाई आणि चलनातील अवमूल्यन स्थितीत सोने नेहमी उपयुक्त ठरते. अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रोत्साहन मिळाल्यास सोन्याचे दर सहसा वाढतात. सिनेटवर रिपब्लिकन्सचे नियंत्रण येण्याची शक्यता असल्याने अंतिम निकालानंतर कोव्हिड-१९ चे प्रोत्साहन पॅकेज ते कदाचित नाकारू शकतात.


कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत घट नाहीच, त्यामुळे संपूर्ण युरोप आणि जगातील काही भागांमध्ये उपाययोजना म्हणून लॉकडाऊनची मालिकाच सुरू आहे. बाजारातील जोखीमीची भावनाच कमी होत आहे. परिणामी सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळत आहे. निवडणुकीनंतर कमोडिटी मार्केटवर मार्ग शोधण्यासाठी निवडणुकीनंतर फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) च्या बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.


कच्चे तेल: निवडणूक निकालाच्या अखेरच्या दिवशी डॉलरचे मूल्य सुधारताना दिसत असून बुधवारी अमेरिकेच्या डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २.३ टक्क्यांनी वाढल्यानंतर गुरुवारी सकाळी १ टक्क्यांनी वाढल्या. ३ महिन्यातील ही विशेष वृद्धी ठरली. तेलाचे दर ४० सेंटनी घसरून ३८.७५ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तर दुसरीकडे ब्रेंड क्रूडचे दर १ टक्क्यांनी किंवा ४१ सेंटनी घसरून ४०.८२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.


अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि २०२१ साठीचे अध्यक्ष घोषित होईपर्यंत तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणखी काही दिवस तशीच राहण्याची शक्यता आहे. डॉलर आणि तेलाच्या किंमतीत व्यस्त संबंध असल्याने बुधवारी डॉलरची कामगिरी खालावली, मात्र गुरुवारी तो मजबूत स्थितीत आाला. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत केलेल्या अवाजवी दाव्यांमुळे बुधवारी तेलाचे दर सुरुवातीला वाढले.


तसेच, ओपेक आणि सदस्यांच्या अपेक्षा, दररोज २ दशलक्ष बॅरल पुरवठा करण्याच्या पूर्वीच्या निर्णयाविरोधात जात असल्याने तेलाच्या दरात ४ नोव्हेंबरपर्यंत वाढ झाली. संपूर्ण जगात लॉकडाऊन आणि कोव्हिड-१९ चा प्रभाव असल्याने जानेवारी महिन्यात त्याची पूर्तता करण्याचा या संघटनांचा हेतू होता. मात्र कोव्हिड-१९ रुग्णसंख्येतील वाढीबाबत अनिश्चितता असल्याने तसेच इतर देशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे हा सकारात्मक ट्रेंड तात्कालिक असल्याचे दिसून येत आहे.