पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिक इथल्या बोट क्लबचा लोगोचे अनावरण


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अर्थात एमटीडीसीचा नवीन लोगो, नाशिक इथल्या बोट क्लबचा लोगो तसेच एमटीडीसीच्या नवीन फिडबॅक क्यूआर कोडचे अनावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.

यावेळी राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने एअर बीएनबी सोबत सामंजस्य करार केला गेला.

या कार्यक्रमाला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, आदी उपस्थित होते.