पत्रकार अर्णब गोस्वामीला १८ नोव्हेंबर पर्यन्त न्यायालयीन कोठडी


मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल अलिबागच्या जिल्हा न्यायालयानं १८ नोव्हेंबरपर्यन्त न्यायालयीन कोठडी सुनावली.

अलिबाग तालुक्यातले वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काल मुंबईतून अर्नबला अटक करुन अलिबाग न्यायालयासमोर हजर केलं.

रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

आज त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.