मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार ५०० रुपये मिळणार बोनस


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. १ लाख ५ हजार कर्मचार्यांना हा बोनस मिळेल.  खाजगी अनुदानित. प्राथमिक शिक्षकाना  ७ हजार ७५० रुपये, शिक्षक सेवकाना ४ हजार ७०० रुपये, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवकाना २ हजार ३५० रुपये, तर आरोग्य सेविकाना ४ हजार ४०० रुपये भाऊबीज भेट मिळणार आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. पालिकेच्या तिजोरीवर यापोटी १५३ कोटी १४ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.