जिल्हानिहाय कोरोना अपडेट


मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात आतार्पयत दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणो मात केली असून सध्या अवघे ५० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याचे ठाणो जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.


परभणी जिल्ह्यात काल १४ तर आतापर्यंत ६१०९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत काल २५ नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण रुग्ण संख्या सहा हजार ५९४ झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.


नाशिक जिल्ह्यात काल ४१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर काल २४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातला रुग्ण दुपटी चा कालावधी १३४ दिवसांवर गेला आहे ही समाधानाची बाब आहे.


नवी मुंबई शहरात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले आहे. आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या ४४ हजार ५२१ आहे. तर ९०१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


वाशिम जिल्ह्यात आज दि.१ नोव्हेंबर रोजी आणि काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवाला नुसार जिल्ह्यात ८ कोरोना  बाधित नवे रुग्ण आढळले तर  वाशिम जिल्ह्यात काल २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत ५ हजार १४७ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. काल ८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या जिल्ह्यातली रुग्ण संख्या पाच हजार ७११ वर पोचली आहे आतापर्यंत १४३ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत सध्या ४२० रुग्णांवर उपचार केले जात आहेत


भंडारा जिल्ह्यात काल ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ४७२ झाली असून आज ५५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ५७४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१९ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या ८३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल २४४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ७७५ झाली आहे. काल ८ तर आतापर्यंत १ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ३१४ रुग्ण उपचाराधीन आहेत.