गायाचे 'हेल्दी सेलिब्रेशन पॅक'


मुंबई : देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गाया (Gaia)ने आपल्या ग्राहकांसाठी गाया सेलिब्रेशन पॅक्सच्या रूपात भेटवस्तू देण्याचा आरोग्यप्रद पर्याय सादर केला आहे. या पॅक्समध्ये अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशा निवडक उत्पादनांचा संग्रह आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी प्रेमाचे आणि निरोगी आरोग्याचे प्रतीक म्हणून ते भेट देता येऊ शकतात. गाया सेलिब्रेशन पॅक ३ पर्यायांत उपलब्ध असून सर्व मोठ्या रिटेल दुकानांसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ईकॉमर्स स्टोर्सवरदेखील उपलब्ध आहेत.


गाया सेलिब्रेशन पॅक १ मध्ये ए२ गाईचे तूप, मल्टीफ्लोरल मध, मसाला ओट्स, स्पोर्ट ट्रेल मिक्स, रोझ इन्फ्युजन, मिश्र बिया आदी उत्पादनांचा समावेश असून याची किंमत १८४५ रुपये आहे. सेलिब्रेशन पॅक २ मध्ये ओटमील कुकीज, स्पोर्ट ग्रॅनोला बार, ग्रीन टी, मसाला ओट्स, मिश्र बिया आदी उत्पादने समाविष्ट असून याची किंमत ७४० रुपये आहे. तर सेलिब्रेशन पॅक ३ मध्ये ओटमील कुकीज, मल्टीग्रेन कुकीज, डार्क चोको चिप कुकीज उपलब्ध असून या पॅकची किंमत १९० रुपये आहे. यांसोबत दैनंदिन जीवनात रोगप्रतिकारकता वाढवण्यासाठी गाया प्लस आमला कॅप्स्यूल्स मोफत मिळणार आहेत.     


हेल्थ आणि वेलनेस ब्रॅंड गायाची पालक कंपनी कॉस्मिक न्यूट्राकॉस सोल्युशन्स प्रा. लि. च्या संस्थापक आणि संचालक डॉली कुमार म्हणाल्या, “यंदाचा सणसुदीचा मोसम हा अनेक अर्थांनी आगळावेगळा असणार आहे. सध्या सुरू असलेली महामारी आणि पोषण आणि कल्याण यांची वाढलेली गरज आणि जागरूकता या पार्श्वभूमीवर आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना चांगल्या आरोग्याची हमी हा सर्वात उत्तम उपहार ठरू शकतो. आमचे सेलिब्रेशन पॅक अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आलेले आहेत, ज्यातून तुम्हाला पौष्टिक आहार आणि रोगप्रतिकारकता वाढवणारी पौष्टिक पूरके प्राप्त होतील. आमच्या या आरोग्यप्रद निवडक उत्पादनांच्या संचांच्या मार्फत आम्ही सणासुदीला देण्याच्या उपहारांमध्ये नवीन पायंडा पाडू इच्छितो.”