अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला.


मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला असल्यानं, रायगड जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर कोणताही निकाल न देता न्यायालयानं पुढची सुनावणी येत्या २३ तारखेला ठेवली आहे.

तर, अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातला जामीन अर्ज काढून घेतला आहे.