सण उत्सवांसाठी पश्चिम रेल्वेकडुन आठ विशेष गाड्या सुरु होणार


नवी दिल्‍ली : आगामी दसरा आणि दिवाळी सणांच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने २४० फेऱ्यांची सेवा देणा-या आठ विशेष रेल्वे सुरु करण्याची योजना आखली आहे. पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रकानुसार, या विशेष जोड गाड्यांपैकी सहा जोड्या मुंबईवरून तर एक इंदूर येथून धावणार आहे, तर एका गाडीला पश्चिम रेल्वेकडून वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे.