फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार आहेत.

सोशल मिडिया व्यासपीठावरील माहितीवरील नियंत्रणाबाबत या कंपन्यांना जबाबदार धरण्यावरून अमेरिकेच्या खासदारांमध्ये दुमत निर्माण झालं आहे.

सोशल मिडिया व्यासपीठाचा वापर करणाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीची अथवा त्यांच्या मतांची जबाबदारी कंपन्यांवर नसल्याचं या तिन्ही कंपन्यांचं म्हणणं आहे.