मुंबई विद्यापीठाच्या दूर मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या परीक्षा उद्यापासून सुरुमुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठाच्या दूर मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत. तृतीय वर्ष बीएची परीक्षा सकाळी तर तृतीय वर्ष बीकॉमची परीक्षा दुपारी होत आहे. या दोन्हीही परीक्षा ऑनलाईन होत आहेत.या परीक्षेसाठी विद्यापीठाने सर्व तयारी केली असून सराव परीक्षा घेण्यात आल्या.

एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेचं प्रवेशपत्र असेल पण काही कारणामुळे लिंक गेली नसेल तर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास त्याला ती लिंक पाठविली जाते. ही हेल्पलाईन सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध आहे. ती हेल्पलाईन मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ३ आणि ६ ऑक्टोबर २०२० रोजी ऑनलाईन परीक्षा यशस्वीरीत्या दिली असेल, त्यांनी ही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही- आदर पूनावाला
Image