काँग्रेसनेच देशातल्या माध्यमस्वातंत्र्यावर घाला घातला - प्रकाश जावडेकर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या माध्यमस्वातंत्र्यावर घाला घालून काँग्रेस पक्ष माध्यमांवर सातत्यानं टीका करत असतो, असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

काही दूरचित्रावणी वाहिन्यांच्या टी आर पी संदर्भात छेडछाड केल्याच्याआरोपावरून काही जणांना अटक केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे, त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना जावडेकर बोलत होते.

माध्यम स्वातंत्र्य हे  भारतीय लोकशाहीचं महत्त्वपूर्ण अंग असून, काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष या लोकशाहीच्या मुख्य खांबालाच लक्ष्य करत आहेत, हे भारतात कधीही खपवून घेतलं जाणार नाही, असंही जावडेकर म्हणाले.