देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पूर्णांक १५ शतांश टक्के


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४८ हजार ६४८ नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. यापैकी ७३ लाख ७३ हजार रुग्ण बरे झाले आहेत.


एकूण रुग्ण संख्येच्या ७ पूर्णांक ३५ शतांश टक्के रुग्ण सध्या उपचार घेत असून त्यांची संख्या ५ लाख ९४ हजार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५७ हजार रुग्ण बरे झाले, असून या काळात ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ९० झाली आहे.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल या संसर्ग तपासणीसाठी ११ लाख ६४ हजार नमुन्यांची चाचणी केली. आतापर्यंत दहा कोटी ७७ लाख चाचण्या झाल्याची माहितीही या परिषदेनं दिली आहे.