ईजोहरीद्वारे 'ज्वेल उत्सव दिवाळी सेल'ची घोषणा


मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या आणि दागिने खरेदीसाठी एकमेव असलेल्या ओम्नीचॅनल मार्केटप्लेस ईजोहरीने या वर्षी सर्वात मोठ्या ज्वेल उत्सव दिवाळी सेलची घोषणा केली आहे. दागिने खरेदीचा हा धमाका २५ ऑक्टोबर रोजी दस-यापासून सुरू होईल आणि दिवाळीपर्यंत चालेल. या भव्य सेलमध्ये ग्राहकांना ३०,००० पेक्षा जास्त दागिन्यांचे डिझाइन्स, २३० पेक्षा जास्त ज्वेलर्स, १३० शहरांमधील ३०० पेक्षा जास्त नोंदणीकृत स्टोअर्समधील उत्पादने ईजोहरी प्लॅटफॉर्मवर सादर केले जातील.


ईजोहरीच्या वार्षिक उत्सव हंगामात चांदीच्या नाण्यांवर फ्लॅश सेलसारख्या आकर्षक ऑफर्स असतील. यासोबतच, विविध प्रकारच्या दागिने श्रेणींवर २००० रुपयांपर्यंत आकर्षक सवलत असेल. सोन्याची उत्कृष्ट किंमतही यावेळी मिळू शकेल. ग्राहकांसाठी आणखी एक करार करत, बहुतांश मोठ्या ज्वेलरी रिटेलर्सनी त्यांच्या दागिन्यांवरील निर्मिती शुल्क १००% नी कमी केले आहे. ईजोहरीने देशभरातील ज्वेलर्सकडून उत्कृष्ट ब्रँड्स, विपुल प्रमाणातील संग्रह, सर्वोत्तम किंमत मिळवून देण्याची संधी ग्राहकांना दिली आहे.


ईजोहरीचे संस्थापक आणि एमडी शैलेन मेहता म्हणाले, ‘लग्नसराईनंतर आकर्षक सणाचा हंगाम आला असून या वर्षात दागिने खरेदीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोन्याच्या चकाकीशिवाय भारतीय सण साजरे होत नाहीत. त्यामुळे आम्ही यावर्षीच्या ज्वेल उत्सवात अभूतपूर्व ऑफर्स दिल्या आहेत. ग्राहकांची किंमतीबाबतची संवेदनशीलता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या काळात एकजुटीची भावना द्विगुणित करत आम्ही या सेलचे आयोजन केले आहे. आमच्या या लहान पण महत्त्वपूर्ण प्रोत्साहनाने ग्राहकांसोबत दीर्घकालीन नाते आणखी दृढ होईल, असा आम्हाला विश्वास आहे.’