मुंबईतल्या बेस्ट बसना पूर्ण क्षमतेने सुरु करायला राज्य सरकारची मान्यतामुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 'बेस्ट' बसेसना पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहने चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेस्ट बसेसमधल्या प्रवाशांनी मास्क घालणे तसेच बसेसचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर या संदर्भातल्या शासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे.


राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.