यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या, नवी दिल्ली इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथे जावे लागणार नाही, तर यंदा ही जत्राचे थेट तुमच्या घरी येणार आहे.

या ऑनलाईन जत्रेत प्रकाशक आपल्या शहरातूनच सहभागी होऊ शकतील, आपली प्रकाशने विकू शकतील, वाचकांना पुस्तके निवडण्याची, खरेदी करण्याची संधी असेल, प्रकाशक आणि वाचक एकमेकांशी संवादही साधू शकतील.

पुस्तके निर्मिती आणि प्रकाशन विश्वातले नवे प्रवाह उलगडून दाखवणारे आणि त्यावर चर्चा घडवून आणणारे २० पेक्षा अधिक वेबिनार आयोजित केले आहेत.

३० आणि ३१ ऑक्टोबरला ही पुस्तक जत्रा होणार असून शंभराहून अधिक प्रकाशक त्यात सहभागी होणार आहेत. ५६ भाषांमधली पुस्तके या जत्रेत मांडली जाणार आहेत.