उत्सवांच्या काळात मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई - गोरखपूर, पुणे - निजामुद्दीन, मडगाव – नागपूर - मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर या गाड्यांचा समावेश आहे.

  फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना रेल्वेत बसताना, प्रवासादरम्यान तसंच गंतव्यस्थानी उतरल्यावर कोविड संबंधी नियमांचं पालन करणं आवश्यक असेल.